मोडाळे शाळेचे शिक्षक खैरनार अपघातात ठार

By Admin | Updated: April 5, 2016 23:08 IST2016-04-05T22:49:13+5:302016-04-05T23:08:50+5:30

मोडाळे शाळेचे शिक्षक खैरनार अपघातात ठार

Modale school teacher killed in Khairanara accident | मोडाळे शाळेचे शिक्षक खैरनार अपघातात ठार

मोडाळे शाळेचे शिक्षक खैरनार अपघातात ठार

 बेलगाव कुऱ्हे : मुंबई-आग्रा महामार्गावर रायगडनगर शिवारात वालदेवी पुलाजवळील हॉटेल तुळजासमोर झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात मोडाळे, ता. इगतपुरी येथील दुचाकीस्वार शिक्षक राजेंद्र भैरवनाथ खैरनार (४४) ठार झाले. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून, या मार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
नाशिककडे जाणारे शिक्षक राजेंद्र खैरनार यांच्या हीरो-होंडा मोटारसायकलला (क्र . एमएच १५ एएम ६५३०) कारने (एमएच १५ डीएम २०१४) मागून जोरात धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे रुग्णवाहक निवृत्ती पाटील गुंड यांनी जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मूळ चास, ता. सिन्नर येथील राजेंद्र खैरनार मोडाळे येथील ज्ञानदा माध्यमिक विद्यालयात दहा वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवत होते. वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोडके, मुकुंदा जाधव करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Modale school teacher killed in Khairanara accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.