शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मोदकाला चॉकलेट, ड्रायफ्रुट्सची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:39 IST

लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी यंदा मावा आणि मलई मोदकाबरोबर यंदा चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, आंबा, स्ट्रॉबेरी फ्लेवरचे मोदकांची क्रेझ मिठाई दुकानात दिसू लागली आहे. तयार मोदकांचा भाव चारशे ते सहाशे रुपये किलो असून, गोड मिठाईबरोबर चटकदार, झणझणीत फराळांचे पदार्थही गौरी पूजनासाठी उपलब्ध झाले आहे.

ठळक मुद्देगोडधोड पदार्थांची मेजवाणी : रवा, बुंदी आणि बेसन लाडूलाही मागणी

नाशिक : लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी यंदा मावा आणि मलई मोदकाबरोबर यंदा चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, आंबा, स्ट्रॉबेरी फ्लेवरचे मोदकांचीक्रेझ मिठाई दुकानात दिसू लागली आहे. तयार मोदकांचा भाव चारशे ते सहाशे रुपये किलो असून, गोडमिठाईबरोबर चटकदार, झणझणीत फराळांचे पदार्थही गौरी पूजनासाठी उपलब्ध झाले आहे.कोरोना आणि टाळेबंदी अशा दुहेरी संकटचे करू अनुभव बाजूला ठेऊन भाविकांनी घरोघरी विघ्नहर गणरायांचे जल्लोषात स्वागत करून बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवला. यंदा घरगुती गणपती उत्सव दहा दिवस असल्याने गोडधोड पदार्थांची मेजवाणी असणार आहे. लाडक्या गणेश बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवला जातो.गूळ खोबऱ्याच्या मोदकाबरोबर मिठाईच्या दुकानात खवा, मलई मोदकाला मोठी मागणी आहे. खव्याच्या मोदकामध्ये पिस्ता, आॅरेंज हे दोन कलर असून मलई मोदकामध्ये आँरेज, स्ट्रॉबेरी, अंजीर, चॉकलेट मोदक ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. छोट्या आकाराचे २१ चॉकलेटी मोदकांचा बॉक्स उपलब्ध आहे.काही बेकरीमध्ये मोदकाच्या आकाराचा शाकाहारी केकही आॅर्डरप्रमाणे उपलब्ध करुन दिले जात आहेत. गणपतीबरोबर गौरीचा सणही मोठ्या प्रमाणावर घरोघरी साजरा केला जातो. गौरीची बडदास्त करताना तिच्यासमोर गोड मिठाईबरोबर फराळाचे तिखट पदार्थांची मांडणी केली जाते.चकली, चिवडा, शंकरपाळी, पापडी, बाकरवडीला मोठी मागणी आहे. गणेश आगमनानंतर गौरी आगमनापूर्वी फराळांच्या पदार्थांना मागणी वाढते असे व्यावसायिकांनी सांगितले.विविध प्रकारचे फरसाण, चिवडा, चकली, शंकरपाळी, शेव अशा फराळाच्या विविध पदार्थांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. फराळ घरी करण्यापेक्षा तयार आणण्याकडे महिला वर्गाचा कल अधिक दिसून येत आहे.बालुशाही, म्हैसूरपाक, बुंदीला मोठी मागणीमोदकात मॅगोचे सारण असल्याने आंबड गोड चवीमुळे चॉकलेट मोदकाला पसंती मिळत आहेत. मोदकाबरोबर खाजा, बालुशाही, म्हैसूरपाक, बुंदीला मोठी मागणी आहे. बुंदीच्या मोठ्या आकाराच्या मोदकाला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. रवा, बुंदी आणि बेसन लाडूलाही मागणी आहे.

टॅग्स :NashikनाशिकGaneshotsavगणेशोत्सव