शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सानू-टोनू-मोनू गँगच्या २० सराईत गुन्हेगारांवर ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 20:13 IST

पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील एकूण ११ संशयितांसह तीघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित डझनभर संशयित फरार आहेत. यामध्ये काही संशयित गुन्हेगार हे अंधेरी, उल्हासनगर, कल्याण या शहरांमधील आहे.

ठळक मुद्देनोव्हेंबर महिन्यात उपनगरला केला होता निघृण खून

नाशिक : चाकू, कोयते घेऊन नाशिकरोड ते उपनगरपर्यंत दहशत माजवून सर्रासपणे शरिराविरुध्द गुन्ह्यांत सक्रीय राहणाऱ्या 'सानू-टोनू-मोनह्' या म्हस्के भावंडांच्या टोळीतील २० सराईत गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. या टोळीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात योगेश पन्नालाल चायल (२३) याच्यावर कोयत्याने सपासप वार करत ठार मारले होते. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील ११ संशयितांसह तीन अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. चायल खून प्रकरणात पोलिसांना अद्याप १२ संशयितांना अटक करायची आहे. या बारांपैकी सहा संशयित गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला आहे.

शहरात खून, प्राणघातक हल्ले यांसारखे शरीराविरुध्दचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी परिमंडळ-१ व २ मधील संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांची जंत्री काढत तपासाचे आदेश दिले आहे. यानुसार नाशिकरोड-उपनगर भागात दहशत माजवून कायदासुव्यवस्थेला वारंवार धोक्यात आणणाऱ्या सानू-टोनू-मोनूच्या टोळीवर अखेर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात टोळीतील एकूण ११ संशयितांसह तीघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित डझनभर संशयित फरार आहेत. यामध्ये काही संशयित गुन्हेगार हे अंधेरी, उल्हासनगर, कल्याण या शहरांमधील आहे. तसेच काही नाशिक शहर व परिसरातील असून त्यांनी शहरातून परजिल्ह्यांमध्ये आश्रय घेतला असून सर्वांना लवकरात लवकर अटक करण्यास पोलिसांना यश येईल, असा आशावाद पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. यावेळी उपायुक्त विजय खरात, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, अनिल शिंदे उपस्थित होते.टोळीमधील हे गुन्हेगार गजाआडटोळीप्रमुख सागर सुरेश म्हस्के ऊर्फ सानू पाईकराव (२२,जेलरोड), हर्ष सुरेश म्हस्के ऊर्फ टोून पाईकराव, साहिल सुरेश म्हस्के ऊर्फ मोनू पाईकराव (२०)रोहित सुरेश लोंढे ऊर्फ भुऱ्या (२१,रा.देवळाली गाव), जय ऊर्फ मारुती वाल्मिक घोरपडे (१८,रा.विहितगाव), राहुल भारत तेलारे ऊर्फ भांडा (१९,रा.बागुलनगर), कलाम सलीम राईन (१९,रा.नाशिकरोड), सत्तू बहीरु राजपुत (२०,रा.जयभवानीरोड), जॉन चलन पडेची (२८,रा.देवळाली कॅम्प), योगेश श्रावण बोडके (२३,रा.पंचवटी), अमन हिरालाल वर्मा उर्फ मामा (३५,रा.समतानगर,अंधेरी), यांच्यासह तीन अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी चायल याच्या खूनाच्या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, दुचाकी वाहनांसह कोयता, चाकू ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकCrime Newsगुन्हेगारी