नेटवर्क मिळत नसल्याने मोबाइलधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:35 PM2020-01-19T22:35:31+5:302020-01-20T00:15:30+5:30

येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पंधरा दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉलमध्येच बंद होणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज न येणे तसेच इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबइलधारकांनी संतप व्यक्त केला आहे.

Mobile users suffer due to lack of network | नेटवर्क मिळत नसल्याने मोबाइलधारक त्रस्त

नेटवर्क मिळत नसल्याने मोबाइलधारक त्रस्त

Next



पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पंधरा दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉलमध्येच बंद होणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज न येणे तसेच इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबइलधारकांनी संतप व्यक्त केला आहे.
एकीकडे रिचार्जचा दर वाढत असताना दुसरीकडे नेटवर्कच मिळत नसल्यामुळे पैसे देऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वच कंपन्यांचे प्लॅन हे मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक असल्यामुळे दिवस तर संपत आहे; परंतु सेवेचा लाभ घेता येत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इिंटरनेट चालत नसल्याने ना कुठला फॉर्म भरता येत आहे, ना कुठले प्रवेशपत्र डाउनलोड करता येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. नेटवर्कच्या शोधात दूरवर कुठे तरी उंचावर उभे राहावे लागत आहे.
गावात सुरू असलेल्या अनेक बँका व कार्यालयांमधील इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याने कर्मचारी व नागरिकांमध्ये वाद होत आहेत. आधुनिक काळामध्ये सर्वच व्यवहार हे फोन पे, गुगल पे, भीम अ‍ॅप यांच्या माध्यमातून केले जातात. मात्र, त्याला अडचणी येत असल्याने संबंधित कंपन्यांनी नेटवर्कवर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी मोबइलधारकांनी केली आहे.

Web Title: Mobile users suffer due to lack of network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल