चाकूचा धाक दाखवून मोबाइल लंपास

By Admin | Updated: April 12, 2017 23:29 IST2017-04-12T23:29:10+5:302017-04-12T23:29:49+5:30

चाकूचा धाक दाखवून मोबाइल लंपास

Mobile traps by knife | चाकूचा धाक दाखवून मोबाइल लंपास

चाकूचा धाक दाखवून मोबाइल लंपास

नाशिकरोड : रेल्वे स्थानकावर आलेल्या मुंबईच्या प्रवाशास रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदारांनी चाकू व फोडलेल्या बिअरच्या बाटलीचा धाक दाखवून मोबाइल व सहाशे रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई अंधेरी ईस्ट येथील संतोषकुमार रामचंद्र यादव (२३) हा युवक पवन एक्स्प्रेसने मुजफ्फराबादहून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरला. जेलरोडला जाण्यासाठी रेल्वेस्थानक बाहेरील रिक्षा (एमएच १५, इएच १२५०) मधून जात असताना काही अंतरावर आणखी दोन रिक्षाचालकांचे जोडीदार रिक्षात बसले. बिटकोनंतर रिक्षाचालक व त्यांच्या दोन साथीदारांनी प्रवासी संतोषकुमार यादव याला शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करत चाकू व बिअरची बाटली फोडून तिचा धाक दाखवत त्यांच्याकडून मोबाइल व सहाशे रुपयाची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. तसेच यादव यांची बॅग घेऊन रिक्षातून उतरवून पळून गेले. रिक्षातून पळून जाताना यादव याने रिक्षाचा क्रमांक घेतला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mobile traps by knife