ट्रकमधून तीळसह मोबाइल चोरी
By Admin | Updated: November 24, 2015 23:11 IST2015-11-24T23:10:49+5:302015-11-24T23:11:24+5:30
ट्रकमधून तीळसह मोबाइल चोरी

ट्रकमधून तीळसह मोबाइल चोरी
मालेगाव : मनमाड-मालेगाव रस्त्यावर चोंढी (जळगाव) गावानजीक फौजी ढाब्यासमोर पुलावर पंक्चर झालेल्या ट्रकमधून तीन अज्ञात इसमांनी तिळाने भरलेल्या १०० गोण्या आणि लावा कंपनीचा भ्रमणध्वनी संच असा एक लाख २९ हजारांचा माल चोरून नेला.
सोमवारी पहाटे चार
वाजता ही घटना घडली. ट्रकचालक जसवीरसिंग दयानंद लाठर (३५), रा. करसोला, ता. दुलाना, जि. जिंद (हरियाणा) याने तालुका पोलिसांत फिर्याद दिली.
ट्रक (क्र. एमएच ४६ डी ०२२८) ही मनमाड रस्त्यावर पंक्चर झाल्याने उभी असताना तीन अज्ञात इसमांनी ट्रकमधील तिळीच्या शंभर
गोण्या व भ्रमणध्वनी संच चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक
शेख करीत आहेत.
(प्रतिनिधी)