नाशिकरोड रेल्वेस्थानकात मोबाइलची चोरी

By Admin | Updated: May 6, 2016 00:08 IST2016-05-05T23:18:42+5:302016-05-06T00:08:32+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानकात मोबाइलची चोरी

Mobile theft in Nashik Road railway station | नाशिकरोड रेल्वेस्थानकात मोबाइलची चोरी

नाशिकरोड रेल्वेस्थानकात मोबाइलची चोरी

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक येथून मनमाडच्या शिक्षकाचा १८ हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
मनमाड गोरे कंपाउंड येथे राहणारे शिक्षक लईक कासान परवेज आझमी (१८) हे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास मनमाडला जाण्यासाठी काशी एक्स्प्रेसमध्ये बसत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांचा १८ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेस्थानकावरील वाढत्या मोबाइल चोऱ्यांच्या घटनांमुळे प्रवासी हतबल झाले आहेत. रेल्वे पोलिसांना मोबाइल चोरट्यांना रोखण्यात यश येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mobile theft in Nashik Road railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.