दिंडोरी रोड परिसरातून मोबाईल चोरी

By Admin | Updated: May 5, 2017 17:16 IST2017-05-05T17:16:09+5:302017-05-05T17:16:09+5:30

भाजीपाला खरेदी करतांना मोबाईल लांबविला

Mobile theft from Dindori Road area | दिंडोरी रोड परिसरातून मोबाईल चोरी

दिंडोरी रोड परिसरातून मोबाईल चोरी

नाशिक : भाजीपाला खरेदी करीत असतांना चोरट्यांनी ग्राहकाच्या खिशातील महागडा मोबाईल हातोहात लांबविल्याची घटना पंचवटी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महालक्ष्मी सिनेमागृहाजवळ घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्"ाची नोंद करण्यात आली आहे. मयुर दिलीप शेळके (रा.सिध्दीविनायक सोसा. खांदवे सभागृह समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेळके बुधवारी रात्री भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केट यार्ड समोर भरणाऱ्या भाजीमंडईत गेले होते. यावेळी ते भाजीपाला खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील सुमारे ३० हजार रुपए किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हातोहात लांबविला. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दरम्यान मार्केट यार्डा समोर भरणाऱ्या या भाजीपाला मंडईत स्वस्त दरात भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची पसंती असते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून येथे मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. पंचवटी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या भाजीबाजारातील चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Mobile theft from Dindori Road area