बँकेतून ग्राहकाच्या रोकडसह मोबाइलची चोरी
By Admin | Updated: April 7, 2017 16:30 IST2017-04-07T16:30:13+5:302017-04-07T16:30:13+5:30
बँकेतील रांगेत पैसे भरण्यासाठी उभ्या असलेल्या इसमाच्या खिशातील रोकड व मोबाइल चोरट्यांनी चोरून नेला़

बँकेतून ग्राहकाच्या रोकडसह मोबाइलची चोरी
नाशिक : बँकेतील रांगेत पैसे भरण्यासाठी उभ्या असलेल्या इसमाच्या खिशातील रोकड व मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पेठफाट्यावरील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत घडली आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रामलखन रामदयाल तिवारी (३८, श्री साई गार्डन अपार्टमेंट, हिरावाडी) यांचा मेव्हणा मनीष चतुर्वेदी हा बँकेत पैसे भरण्यासाठी गेला होता़ बँकेत पैसे भरणाऱ्या नागरिकांच्या रांगेत उभ्या असलेल्या चतुर्वेदी यांच्या पाठीमागे रांगेत उभा असलेल्या इसमाने नजर चुकवून त्यांच्या खिशातील ४० हजार रुपयांची रोकड व मोबाइल फोन असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़