अभियांत्रिकीचा विद्यार्थीच निघाला मोबाइल चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 16:59 IST2017-12-02T16:57:33+5:302017-12-02T16:59:46+5:30

Mobile sophisticated student of engineering | अभियांत्रिकीचा विद्यार्थीच निघाला मोबाइल चोरटा

अभियांत्रिकीचा विद्यार्थीच निघाला मोबाइल चोरटा

ठळक मुद्देआडगाव पोलीस ठाणे ; गुन्हा दाखलमविप्र रुग्णालयातील प्रशिक्षणार्थींचे चोरले मोबाइल

नाशिक : आडगाव शिवारातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व संशोधन संस्थेत शिक्षण घेणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरणाºया एकास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ गौरव प्रकाश खैरनार असे या मोबाइल चोरट्याचे नाव असून, विशेष म्हणजे तो क़ का़ वाघअभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे़ पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे तीन मोबाइलही जप्त केले आहेत़
डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाजवळ प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे़ सुमारे दीड महिन्यापूर्वी संशयित गौरव खैरनार (रा़ मातृदर्शन सोसायटी, आडगाव, मूळ रा़ सटाणा) याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरून नेले होते़ ही चोरी करताना खैरनार हा सीसीटीव्हीत कैद झाला होता़ त्या आधारे आडगाव पोलीस संशयिताचा शोध घेत असतानाच गौरव खैरनारला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली़
पोलिसांनी संशयित खैरनार यास अटक केली असून, त्याच्याकडून ३९ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत़ दरम्यान, तो अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ग मेकॅनिकलचा विद्यार्थी असून, सद्यस्थितीत पोलीस कोठडीत असल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी दिली़

Web Title: Mobile sophisticated student of engineering