मारहाणीची धमकी देऊन मोबाइलची लूट
By Admin | Updated: May 9, 2017 16:53 IST2017-05-09T16:53:38+5:302017-05-09T16:53:38+5:30
मारहाणीची धमकी देऊन मोबाइलची लूट

मारहाणीची धमकी देऊन मोबाइलची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मोबाइलवर बोलत चाललेल्या युवकास मारहाण करण्याची धमकी देत तिघा संशयितांनी मोबाइलची लूट केल्याची घटना रविवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास शरणपूर रोडवरील पी अॅण्ड टी कॉलनीत घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमराल्ड पार्क येथील चक्र गगनसिंग सेडाल (२२) हा युवक रविवारी रात्रीच्या सुमारास पी अॅण्ड टी कॉलनीतील गार्डन समोरून पायी जात होता़ यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी सेडाल यास अडवत मोबाइल दे अन्यथा मारहाण करू, अशी धमकी देऊन सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल बळजबरीने खेचून नेला़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.