फुले खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांचे मोबाइल लंपास
By Admin | Updated: October 24, 2015 22:24 IST2015-10-24T22:23:26+5:302015-10-24T22:24:14+5:30
फुले खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांचे मोबाइल लंपास

फुले खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांचे मोबाइल लंपास
नाशिक : झेंडूची फुले खरेदीसाठी गेलेल्या दोघांचे हजारो रुपयांचे मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ऐन दसऱ्याच्या दिवशी घडली आहे़ या प्रकरणी सरकारवाडा व नाशिकरोड पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पाथर्डी शिवारात राहणारे अक्षय संजय धोंगडे (२०) हे दसऱ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रविवार कारंजा परिसरात झेंडूची फुले खरेदीसाठी आले होते़ या ठिकाणी फुले खरेदी करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या खिशातील २० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला़ या प्रकरणी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
दुसरी मोबाइल चोरीची घटना बिटको पॉइंटवर घडली आहे़ सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील धनंजय गोविंद बोडके हे गुरुवारी (दि़ २२) रात्री आठ वाजेच्या सुमारास बिटको पॉइंटवरील बँक आॅफ बडोदासमोरून फुले खरेदी करीत होते़ त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)