मनसेच्या गटनेतापदी पुन्हा सातभाईं
By Admin | Updated: July 19, 2014 21:16 IST2014-07-18T01:33:38+5:302014-07-19T21:16:51+5:30
मनसेच्या गटनेतापदी पुन्हा सातभाईं

मनसेच्या गटनेतापदी पुन्हा सातभाईं
नाशिक : महापालिकेतील मनसेच्या गटनेतापदी अशोक सातभाई यांनाच वर्षभरासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मनसेने हा निर्णय घेतला असला, तरी कॉँग्रेसला मात्र कोणताही निर्णय घेता आलेला नाही. राजीनामा देऊनही लक्ष्मण जायभावे हेच या पदावर कायम आहेत.
दोन महिन्यांपूर्वी मनसेचे गटनेता अशोक सातभाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. वर्षभरासाठीच आपली नियुक्ती असल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्या यापूर्वीच्या दौऱ्यादरम्यान नवीन गटनेत्याची निवड होईल असे सांगितले जात होते. तथापि, या दौऱ्यातच सातभाई यांना आणखी वर्षभरासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
कॉँग्रेस पक्षाचे गटनेता लक्ष्मण जायभावे यांनीदेखील राजीनामा देऊन एक महिना उलटला आहे; परंतु पक्षाला अद्याप नवीन गटनेताच सापडलेला नाही. या पदासाठी महिलेला संधी मिळावी अशी मागणी आहे. त्यादृष्टीने योगिता अहेर आणि वत्सला खैरे यांची नावे आघाडीवर होती. परंतु नंतर हा विषय मागे पडला आहे. तथापि, गटनेत्याने स्वच्छेने राजीनामा देऊनही नवीन गटनेता कॉँग्रेसला सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)