शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनसे जिल्ह्यातील सर्व जागा लढविणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:01 IST

पुन्हा मैदानात उतरायचंय, ते जिंकण्यासाठीच! असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढविणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

ठळक मुद्देइंजिन धावणार । १५ जागांवर सक्षम उमेदवारांसह जिंकण्याचा निर्धार

नाशिक : पुन्हा मैदानात उतरायचंय, ते जिंकण्यासाठीच! असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढविणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या गजबजलेल्या पक्ष कार्यालयातील बैठकीत मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनोज घोडके, सुजाता डेरे, अर्चना जाधव, भानुमती अहिरे आदी पदाधिकारी आणि अन्य सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत बोलताना पानसे यांनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढले.या सरकारने केवळ भूमिपूजने आणि घोषणा करण्यातच त्यांचा सगळा काळ खर्च केला. हे केवळ बोलघेवडे सरकार असून, त्यांनी सामान्यांच्या समस्यांमध्ये भर घालण्याचेच काम केले आहे. त्यामुळे या सर्व बाबी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन सांगाव्यात. त्यातूनच या सरकारच्या विरोधी जनमत तयार होणार असून, हे जनमतच निर्णायक ठरेल, असा विश्वास पानसे यांनी व्यक्त केला.बैठकीच्या प्रारंभी बोलताना देशपांडे यांनी उमेदवार कोण असेल? त्याचा विचारदेखील करू नका. तो विचार राजसाहेब यांच्याकडून केला जाऊनच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे दिलेला उमेदवार हा राजसाहेबच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना जिंकविण्यासाठीच लढा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. प्रत्येक कार्यकर्त्याने किमान ५० ते १०० घरांमध्ये जाऊन निवडणुकीसाठी प्रचार करावा, असेही देशपांडे यांनी नमूद केले.राजगड पुन्हा बहरले२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मनसेच्या नाशिकमधील राजगड या कार्यालयाला मरगळ आली होती. त्यातच २०१७ च्या निवडणुकीत महापालिकादेखील हातून गेल्यानंतर राजगड कार्यालय तर बहुतांश वेळा ओस पडल्याचेच चित्र होते.४मात्र, मनसेने यंदाची निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यानंतर शुक्रवारपासून गजबजू लागलेले राजगड कार्यालय शनिवारी पुन्हा खऱ्या अर्थाने बहरल्याचे चित्र दिसून आले.मनसेने जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधरा जागांवर उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले असले तरी नाशिक शहरी भाग वगळता अन्यत्र मनसेचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये मनसेला ताकदवान व निवडणूक जिंकण्याचे मेरिट असलेले उमेदवार मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पक्षाबाहेरीलही उमेदवार असू शकतील असे सूतोवाच केल्याने आयारामांना संधी मिळू शकते.ढिकलेंची अनुपस्थितीठरली चर्चितराजकीय वारसा लाभलेले आणि पूर्व विधानसभेतील एक इच्छुक उमेदवार असलेले राहुल ढिकले यांची या सभेला असलेली अनुपस्थिती बैठकीनंतर विशेष चर्चित ठरली. राहुल हे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांनी यामुळे पुन्हा एकदा वेग घेतला.४या मतदारसंघातील भाजपची उमेदवारी बदलण्याची चर्चा लक्षात घेता ढिकले यांनी मध्यंतरी मनसे नेते व निशाणी टाळून आपला प्रचार केल्याचे दिसून आले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेElectionनिवडणूक