संजय पाठक, नाशिक- राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या एसटी कष्टकरी जनसंघाचे नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांनी मोबाईलवरून चांगलीच कान उघडणी करून शिवराळ भाषेत टीका केली अर्थात, सदावर्ते यांनीही आपल्या भाषेच्या मुद्यावर ठाम भूमिका ठेवत मेरी मर्जी असे सुनावले आहे.
यासंदर्भात सेाशल मिडीयावर ही ऑडीओ क्लीप चांगलीच व्हायरल झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईत मराठीचा मुद्दा घेऊन आंदोलन केल्यानंतर त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती. विशेषत: राज ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मनोज घोडके यांनी गुणरत्न सदावर्ते यांना फोन करून कान उघडणी केली. त्यावर सदावर्ते यांनी देखील मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मी मराठी बोलेल, हिंदी बोलेल किंवा गुजराथी मेरी मर्जी, असे सांगून फोन ठेवला आहे. हा ऑडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.