मनसेचे नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांचे नाव वगळण्यात आले

By Admin | Updated: November 8, 2014 00:57 IST2014-11-08T00:57:12+5:302014-11-08T00:57:50+5:30

मनसेचे नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांचे नाव वगळण्यात आले

MNS leaders and names of former MLA Vasant Gite were excluded | मनसेचे नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांचे नाव वगळण्यात आले

मनसेचे नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांचे नाव वगळण्यात आले

नाशिक : मनसेची सत्ता असलेल्या महापालिकेचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी बनविलेल्या पत्रिकेतून मनसेचे नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांचे नाव वगळण्यात आले असून, दुसरीकडे राजीनामा दिलेल्या जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरेंना मात्र सन्मानाने आमंत्रित करण्यात आले आहे, तर दुसरीकडे महापालिकेत प्रतिनिधित्व करता करताच विधानसभेत पोहोचलेल्या तिघा नवनिर्वाचित आमदारांना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देऊनसुद्धा त्यांनी या कार्यक्रमाकडे फिरविलेली पाठ हा चर्चेचा विषय झाला होता. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असतानाही मनसेचे नेते असणारे वसंत गिते यांचे नाव आमंत्रण पत्रिकेत नसल्याने त्यांना आमंत्रण दिले की नाही याबद्दलही चर्चा सुरू होती. माजी आमदार आणि मनसेचे शहरातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना आमंत्रण देणे आणि त्यांची उपस्थिती असणे गरजेचे होते; परंतु तसे दिसले नाही. मनपाच्या लोकप्रतिनिधींनी भुजबळांशी घेतलेल्या भेटीप्रसंगीही गिते उपस्थित नव्हते. गिते यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि आता त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही असे गृहीत धरले तरी राजकीय पक्षांच्या अधिकाऱ्यांची नावे असलेल्या निमंत्रण पत्रिकेत राजीनामा दिलेल्या सचिन ठाकरेंचेही नाव आहे. त्यामुळे गितेंची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली.
सध्या नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधीची भासणारी चणचण सर्वश्रुत असताना, आणि नगरसेवकांपासून ते महापौरांपर्यंत सर्वच जण त्याची ओरड करीत असताना, सत्ताधारी पक्षाच्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून नवनिर्वाचित आमदार उपस्थित राहून काहीतरी आश्वासन देतील अशी अपेक्षा होती. पालिकेच्या वर्धापनदिनाच्या पत्रिकेत या सर्वच आमदारांची नावे सन्माननीय उपस्थित म्हणून टाकण्यात आली होती; परंतु एक दिवसाआधीच महापौरांसह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंहस्थ निधीसाठी भुजबळांची भेट घेतल्याने सत्ताधारी असूनही आपल्याला डावलल्याची खंत भाजपा आमदारांना वाटत असल्यानेच त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. एकूणच वर्धापनदिनाच्या कार्यक्रमावरही गटबाजीचेच सावट दिसून आले.

Web Title: MNS leaders and names of former MLA Vasant Gite were excluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.