शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रूग्णालयात प्रसुती दरम्यान महिला मृत्यू झाल्याने मनपाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 18:50 IST

नाशिक : पंचवटीतील शिवनगर भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान नाशिकरोड येथील एका खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, संबंधित महिलेच्या पतीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे धाव घेत संशयास्पद माता मृत्यूची चौकशीची मागणी केली. महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली शहर कार्यक्षेत्रात होणाºया माता मृत्यूची चौकशी करण्याचे अधिकार असून, आता या समितीने चौकशी सुरू केली असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी शुक्रवारी (दि.१५) महापालिकेत आयोजित आरोग्य वैद्यकीय समितीच्या बैठकीत दिली.

ठळक मुद्देआरोग्य वैद्यकिय समितीच्या बैठकीत चर्चासभापती सतीश कुलकर्णी यांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक : पंचवटीतील शिवनगर भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान नाशिकरोड येथील एका खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, संबंधित महिलेच्या पतीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे धाव घेत संशयास्पद माता मृत्यूची चौकशीची मागणी केली. महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली शहर कार्यक्षेत्रात होणाºया माता मृत्यूची चौकशी करण्याचे अधिकार असून, आता या समितीने चौकशी सुरू केली असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी शुक्रवारी (दि.१५) महापालिकेत आयोजित आरोग्य वैद्यकीय समितीच्या बैठकीत दिली.महापालिकेच्या सभागृहात सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी सभापतींनी याबाबत प्रशासनाला विचार केली होती. शिवनगर येथील नीलिमा राजेश जाधव या मातेला दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्यादरम्यान प्रसूतीकळा सुरू झाल्यामुळे नाशिकरोडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साधारण सकाळी ९ वाजता तिने दुस-याही स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. त्यावेळी डॉक्टरांनी माता व मुलगी दोघेही सुखरूप असल्याचे सांगितल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. त्यानंतर मुलीला नातेवाइकांना बघण्यासाठीही दिले मात्र पत्नी लवकरच भुलीतून शुद्धीवर येईल, असे सांगत भेटण्यास मनाई केली. त्यानंतर काही काळातच डॉक्टरांनी प्रकृती खराब झाल्याचे सांगितल्यामुळे धक्का बसला. काही वेळात तर डॉक्टरांनी वाचण्याची शक्यता कमी आहे. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत आहे, असे सांगत अन्य मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास संबंधित रुग्णालयात नीलिमा हिचा मृत्यू झाला. या प्रकरणात रुग्णालयाचा हलगर्जीपणा झाला असून, दोषी अधिका-यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.रुग्णालयातील आयपीडी पेपरवरून नीलिमा ही प्रसूतीनंतरही किंबहुना भूल देण्यापूर्वी व्यवस्थित होती, असे पती जाधव यांनी गमे यांना सांगितले. तिचे हिमोग्लोबीन, रक्तदाब व हृदयाचे ठोकेही व्यवस्थित असल्याचे नमूद करीत संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची कागदपत्रे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड यांनी ताब्यात घेतली असून, माता मृत्यू समितीमार्फत चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. जाधव यांनी भुलीच्या ओव्हरडोसमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे, त्याबाबत कुलकर्णी यांनी समितीच्या बैठकीत करवाईबाबत विचारणा केली होती.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य