मनसेचे डिपॉझीटही जप्त धोक्याची घंटा : राज प्रकरण गांभीर्याने घेणार

By Admin | Updated: May 17, 2014 00:44 IST2014-05-17T00:01:33+5:302014-05-17T00:44:29+5:30

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना पराभव पत्करावा लागलाच; परंतु डिपॉझीटही वाचवता आलेले नाही. शहरात तीन आमदार, महापालिकेत ३९ नगरसेवक असल्याने सत्ता असतानादेखील मानहानीकारक पराभव झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात असून, आता राज कोणती भूमिका घेणार याकडे सार्‍यांचेच लक्ष लागून आहे.

MNS Deposit also seized danger bells: Raj matter should be taken seriously | मनसेचे डिपॉझीटही जप्त धोक्याची घंटा : राज प्रकरण गांभीर्याने घेणार

मनसेचे डिपॉझीटही जप्त धोक्याची घंटा : राज प्रकरण गांभीर्याने घेणार

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना पराभव पत्करावा लागलाच; परंतु डिपॉझीटही वाचवता आलेले नाही. शहरात तीन आमदार, महापालिकेत ३९ नगरसेवक असल्याने सत्ता असतानादेखील मानहानीकारक पराभव झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात असून, आता राज कोणती भूमिका घेणार याकडे सार्‍यांचेच लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकीत डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. ग्रामीण भाग सोडला तर शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांत मनसेचे वसंत गिते, ॲड. उत्तमराव ढिकले आणि नितीन भोसले हे आमदार आहेत. तसेच पालिकेत सत्ता आहे. त्र्यंबकेश्वर आणि भगूरमध्येही मनसे नगरसेवक आहेत. असे असताना डॉ. प्रदीप पवार यांना डिपॉझीट वाचविण्याइतपतही मते मिळालेली नाहीत. एकूण ९ लाख ३७ हजार ४०५ मतदान झाले. त्यापैकी केवळ ६३ हजार ५० मते मिळाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून हेमंत गोडसे निवडणूक लढवित होते. त्यांना २ लाख १६ हजार ६७४ मते मिळाली होती. यावेळेस इतकी तर सोडाच, पाऊण लाख मतेही मनसेला मिळाली नाहीत आणि मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे.
लोकसभा निवडणुकीतील गोंधळाचा अंदाज राज ठाकरे यांना आल्यानेच आठवडाभरापूर्वी त्यांनी येऊन या निवडणुकीत काय काय चुका झाल्या याची माहिती घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांना हे प्रकरण गांभीर्याने घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्याकडून अहवाल मागितला जाण्याची शक्यता असून, त्यानंतरच संंबंधितांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे.
मनसेबरोबरच १३ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त
लोकसभा निवडणुकीत ९ लाख मतदान झाले होते. त्याच्या दहा टक्के मते मिळाल्यास डिपॉझीट वाचणार होते. परंतु छगन भुजबळ वगळता अन्य एकही पराभूत डिपॉझीट वाचवू शकला नाही. डॉ. प्रदीप पवार यांच्याबरोबरच बसपाचे दिनकर पाटील, माकपाचे ॲड. तानाजी जायभावे, आपचे विजय पांढरे आणि अन्य नऊ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे.

Web Title: MNS Deposit also seized danger bells: Raj matter should be taken seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.