मनसे नगरसेवक मटाले यांचा पाणी बचतीसाठी पुढाकार
By Admin | Updated: November 16, 2015 21:36 IST2015-11-16T21:35:52+5:302015-11-16T21:36:34+5:30
मनसे नगरसेवक मटाले यांचा पाणी बचतीसाठी पुढाकार

मनसे नगरसेवक मटाले यांचा पाणी बचतीसाठी पुढाकार
सिडको : नाशिक शहराच्या हक्काचे पाणी शासनाने मराठवाड्याला सोडल्याने भविष्यात नाशिक शहरवासीयांना पाणीटंचाई भासू नये यासाठी मनसेचे गटनेते व नगरसेवक अनिल मटाले यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी पाणी बचतीबाबतची पत्रके प्रभागात वाटप केली.
शासनाने नाशिक शहराचे पाणी मराठवाड्याला सोडल्याने भविष्यात नाशिक शहरवासीयांना पाणीटंचाई सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता यात नाही. या विरोधात मनसेच्या वतीने महापौरांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही केले असून, यास विरोधही सुरूच आहे. नाशिक शहरापासून काही अंतरावर असलेल्या मनमाड शहरात ३० ते ४० दिवसांनी पाणी येते. आपल्या जिल्ह्यातदेखील पाणीटंचाई सुरू झाली असून, याचाच एक भाग म्हणू प्रभाग क्रमांक ४८चे नगरसेवक अनिल मटाले यांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यात नाशिककरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता असल्याने आतापासूनच पाणी बचत करणे गरजेचे झाले आहे. यासाठी अनिल मटाले यांनी प्रभागात जनजागृती सुरू केली. पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळावा, अशा आशयाचे पत्रक प्रभागात वाटप करण्यात आले. प्रभागातील नागरिकांना पत्रकाचे वाटप करून पाणी बचतीबाबत आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)