मनपाचे सफाई कर्मचारी गणवेशापासून वंचित

By Admin | Updated: August 9, 2015 22:45 IST2015-08-09T22:44:33+5:302015-08-09T22:45:26+5:30

मनपाचे सफाई कर्मचारी गणवेशापासून वंचित

MMP's clean staff deprived of uniform | मनपाचे सफाई कर्मचारी गणवेशापासून वंचित

मनपाचे सफाई कर्मचारी गणवेशापासून वंचित

नाशिक : महापालिकेतील पुरुष व महिला सफाई कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपासून गणवेश व गणवेशपूरक साहित्य न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात साथीचे आजार पसरू नयेत व शहर स्वच्छ राहावे, यासाठी मनपाचे सफाई कर्मचारी स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता घाणीच्या साफसफाईची कामे करतात; मात्र त्यांना २०१२ नंतर गणवेश, गमबूट, स्वेटर व रेनकोट आदि साहित्य मिळालेले नाही. महापालिकेच्या पुरुष व महिला सफाई कर्मचाऱ्यांना तत्काळ गणवेश व गणवेशपूरक साहित्य देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन महापौर व आयुक्तांना देऊन त्यांना साकडे घालण्यात आले आहे.
मनपा प्रशासन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे हक्क व सवलती हेतुपुरस्सर डावलत असून, महापौर व आयुक्तांनी याप्रश्नी लक्ष घालून अन्याय दूर करावा, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर नाशिक महानगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, उपाध्यक्ष रावसाहेब रूपवते, सचिव अ‍ॅड. तानाजी जायभावे यांच्यासह राजेंद्र गायकर, सुनील राठोड, दीपक लांडगे, जगदीश देशमुख, भाऊसाहेब साळवे, अजय सौदागर, अजय खळगे व राजेंद्र सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: MMP's clean staff deprived of uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.