शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

मनपाच्या सत्ताधिकाऱ्यांना फरांदे यांचा घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:26 AM

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात वैद्यकीय असुविधेमुळे महिला फरशीवर प्रसूत झाल्याप्रकरणी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आपल्याच पक्षाच्या सत्ताधिकाºयांना घरचा आहेर दिला असून, २४ तासांत दोषी अधिकाºयांवर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. विधान सभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी शासनाला याची गंभीर दखल घेण्यास सांगितले, तर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी यासंदर्भात माहिती घेऊन सभागृहात निवेदन करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देरुग्णालयातील प्रसूती : विधानसभेत दिला उपोषणाचा इशारा

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात वैद्यकीय असुविधेमुळे महिला फरशीवर प्रसूत झाल्याप्रकरणी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आपल्याच पक्षाच्या सत्ताधिकाºयांना घरचा आहेर दिला असून, २४ तासांत दोषी अधिकाºयांवर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. विधान सभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी शासनाला याची गंभीर दखल घेण्यास सांगितले, तर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी यासंदर्भात माहिती घेऊन सभागृहात निवेदन करण्याचे आश्वासन दिले.महापालिकेत भाजपाची सत्ता असतानादेखील आमदार फरांदे यांनी संस्थेत योग्य काम होत नसल्याची टीका केली. झाकीर हुसेन रुग्णालयाबाबत पॉइंट आॅफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदर घटना सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना नाशिक महानगरपालिकेत ही पहिली घटना नसून याआधीदेखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या मायको रु ग्णालय व इंदिरा गांधी रु ग्णालय येथेदेखील उपचाराअभावी बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी एका मातेने बालकाचा मृतदेह उपायुक्तांच्या टेबलावर ठेवला होता, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.महिला रुग्णालयाचाही मुद्दा उपस्थितभाजपाची सत्ता असतानाही महिला रु ग्णालयासाठी जागा देण्यास महापालिका टाळाटाळ करीत आहे. शासनाने २२ फेब्रुवारीस आदेश दिलेले असतानाही महानगरपालिका मात्र दुर्लक्ष करत आहे. शासनाचे लेखी आदेश प्राप्त होऊन चार महिन्यांचा कालावधी होऊनही अद्याप कारवाई झाली नसल्याची बाब प्रा. देवयानी फरांदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :Healthआरोग्य