साहित्य संमेलनासाठी आमदार देणार निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:27+5:302021-02-05T05:40:27+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मराठी साहित्य संमेलनाचा ...

साहित्य संमेलनासाठी आमदार देणार निधी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मराठी साहित्य संमेलनाचा मान नाशिकला मिळावा ही भूषणावह बाब असून, त्यानिमित्ताने देशभरातील साहित्यिक, विज्ञानवादी, लेखक नाशिकला भेट देणार आहेत. त्यामुळे नाशिक शहर सुंदर व स्वच्छ असणे गरजेचे असल्याचे सांगून, या संमेलनाच्या निमित्ताने येणारा खर्च उचलण्यासाठी राज्य सरकारने ५० लाखांची आर्थिक मदत दिली आहे. आपणही दहा लाख रुपये देणार असून, उपस्थित सर्व आमदारांनीही प्रत्येकी दहा लाख रुपये विकास निधीतून देऊन साहित्य संमेलनाला हातभार लावावा, असे सांगताच सर्व उपस्थित आमदारांनी भुजबळ यांच्या सूचनेला हात वर करून समर्थन दिले. याबाबत प्रत्येक आमदाराने आपले नाहरकत पत्र जिल्हा प्रशासनाला सादर करावे, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. शासन किती निधीला मान्यता देते ते पाहू, असे सांगितले. जिल्ह्यात पंधरा आमदार असून, अशा प्रकारे दीड कोटी रुपये निधी साहित्य संमेलनाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.