शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
2
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
6
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
7
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
8
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
9
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
10
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
11
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
12
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
13
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
14
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
15
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
16
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
17
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
18
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
19
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
20
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!

मिसळबरोबरच साग्रसंगीत पार्ट्यांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:43 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीची चाहुल लागल्यानंतरच सुरू झालेल्या कार्यकर्त्यांच्या मिसळ ते पार्ट्याने ऊत आला असून, सायंकाळनंतर हॉटेल्सला गर्दी होऊ ...

नाशिक : विधानसभा निवडणुकीची चाहुल लागल्यानंतरच सुरू झालेल्या कार्यकर्त्यांच्या मिसळ ते पार्ट्याने ऊत आला असून, सायंकाळनंतर हॉटेल्सला गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या असल्या तरी या अशा निवडणुकांसाठी इच्छुकांना अगोदरच तयारी करावी लागते. यादृष्टीने अनेक पक्षातील इच्छुकांनी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. नाशिक शहरात अनेक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी निवडणुकीची तयारी करताना वाढदिवस आणि निधनाची घटना चुकवली नाही. अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावून संबंधितांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय कार्यकर्त्यांना सांगून विविध समाजाच्या वतीने किंवा संस्थांच्या वतीने गुणवंताचे सत्कार किंवा मेळावा ठेवून त्याठिकाणी देखील संपर्क वाढण्याचे साधन झाले आहे. त्याचप्रमाणे देवळाली येथे तर एका इच्छुकाने गेल्या वर्षभरापासून अनेक गावात आणि वस्तीत कीर्तन सोहळे आयोजित करून प्रचार सुरू केला आहे. अर्थात, हे सर्व आयोजन-नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबाजावणीसाठी कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. त्यामुळे सध्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. दररोज इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यापासून ते उमेदवाराबरोबर दिवसभर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार म्हणून साग्रसंगीत पार्ट्या रंगू लागल्या आहेत. कार्यकर्त्यांसाठी खास हॉटेल आणि ढाबे बुक करून त्याकडे कार्यकर्त्यांना सर्रास पाठविले जाते. त्याचप्रमाणे सकाळच्या वेळी नाश्ता पाणीदेखील उमेदवारच करीत आहेत.उमेदवारी आधीच खर्च...साधारणत: कार्यकर्त्यांना जमवून त्यांना प्रचाराला लावणे आणि पूर्णवेळ प्रचारानंतर पार्ट्या करणे हे उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रचाराला रंग चढू लागला की सुरू जाते. परंतु यंदा मात्र गेल्या वर्षभरापासूनच उमेदवारांच्या संपर्क मोहिमा सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्ते टिकवणे आव्हान असल्याने आतापासूनच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी उमेदवारांना हात सैल सोडावे लागत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक