दुचाकी अपघातात शिक्षिका ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:48 IST2017-11-04T00:48:10+5:302017-11-04T00:48:10+5:30
तालुक्यातील खिरमाणी जनता विद्यालयाच्या शिक्षिका सरोज अनाजी सोनवणे (४९) या गुरुवारी शाळेतून घरी जात असताना दुचाकी घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकी अपघातात शिक्षिका ठार
सटाणा : तालुक्यातील खिरमाणी जनता विद्यालयाच्या शिक्षिका सरोज अनाजी सोनवणे (४९) या गुरुवारी शाळेतून घरी जात असताना दुचाकी घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
येथील नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती संचलित खिरमाणी येथील विद्यालयातील शिक्षिका सरोज (अनिता) अनाजी सोनवणे या सटाणा येथून दुचाकीवर ये - जा करत.
गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास सटाणा - नामपूर रस्त्यावरील कुपखेडानजीक पेट्रोलपंपसमोर दुचाकीचे अचानक ब्रेक लागल्याने दुचाकी घसरली. या अपघातात सोनवणे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ सटाणा येथील रुग्णालयात नेण्यात ैआले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ नाशिक येथे घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचे पती अनाजी सोनवणे यांचेही दुर्दैवी अपघाती निधन झाले आहे.