लोहोणेर : देवळा तालुक्यातील सावकी येथील गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कीर्ती रमेश अवस्थी या तरु णीचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला असून, यामुळे सावकी परिसरात खळबळ उडाली आहे.सावकी येथील कीर्ती रमेश अवस्थी, रा. सावकी (१७) ही तरु णी दोन दिवसांपासून घरातून निघून गेली होती. तिचा इतरत्र शोध घेण्यात आला होता. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. शनिवार सकाळी ११ वाजता सावकी - सावकी फाटा रस्त्यावरील रायगडनगर येथील शेतकरी मयत कीर्ती अवस्थी हिचे मामा बापू गोकुळ तिवारी यांच्या मालकीच्या शेततळ्यात मयत कीर्ती अवस्थी हिचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, मयत कीर्ती अवस्थी हिच्या मृतदेहाचे देवळा येथील ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन नंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.
बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:26 IST
लोहोणेर : देवळा तालुक्यातील सावकी येथील गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कीर्ती रमेश अवस्थी या तरु णीचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला असून, यामुळे सावकी परिसरात खळबळ उडाली आहे.
बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला
ठळक मुद्देदेवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद