आठवडे बाजारातून मुलगी बेपत्ता
By Admin | Updated: July 21, 2016 22:51 IST2016-07-21T22:51:24+5:302016-07-21T22:51:49+5:30
आठवडे बाजारातून मुलगी बेपत्ता

आठवडे बाजारातून मुलगी बेपत्ता
नाशिकरोड : सुभाषरोड भारतीमठ येथील राजेश छगन चोहान हे आपल्या पत्नीसह सोमवारी सायंकाळी देवळालीगाव आठवडे बाजारात भाजी आणण्यास गेले होते. यावेळी त्यांची १३ वर्षांची मुलगी आशा हीदेखील सोबत आली होती. मात्र ती आठवडे बाजारातून कोणालाही काही एक न सांगता कुठेतरी निघून गेली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)