बेपत्ता युवकाचा सापडला मृत्यूदेह

By Admin | Updated: February 7, 2015 01:00 IST2015-02-07T00:58:35+5:302015-02-07T01:00:25+5:30

बेपत्ता युवकाचा सापडला मृत्यूदेह

Missing boy found dead | बेपत्ता युवकाचा सापडला मृत्यूदेह

बेपत्ता युवकाचा सापडला मृत्यूदेह

  नाशिक : शरणपूररोडवरील सुमती सोसायटी येथे राहणारा हर्षील मनोज शहा (२२) हा युवक मंगळवारपासून बेपत्ता होता. आज सुयोजित टॉवर येथील नदीपात्रात त्याचा मृत्यूदेह तरंगताना आढळला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा नदीपात्रात शोध घेतला जात होता. मात्र काहीच आढळून न आल्याने त्याचे बेपत्ता होण्याचे गूढ वाढले होते. दरम्यान, हर्षील मंगळवारी (दि.३) दुपारी २ वाजेच्या सुमारास घरातील मंडळींना पाच मिनिटांत जाऊन येतो असे सांगूण अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरून घराबाहेर पडला होता. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. हर्षीलची गाडी गंगापूररोडजवळील नदी किनारी आढळल्याने सरकारवाडा पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिवसभर नदीपात्रात त्याचा शोध घेतला. मात्र काहीही हाती लागले नाही. यानंतर बुधवारी सायंकाळी १० मिनिटांसाठी हर्षीलचा मोबाइल सुरू झाला होता. त्याचे लोकेशन गंगापूर भागात दाखविल्याने तो नाशिकमध्येच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आज सकाळच्या सुमारास त्याचा मृत्यदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. याबाबत गंगापूर व सरकारवाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Missing boy found dead