शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अवकाळी निधी ठरतोय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 01:03 IST

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या निधीची रक्कम मिळण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.

ठळक मुद्देउदासीनता : बँकेच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

कंधाणे : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या निधीची रक्कम मिळण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.बागलाण तालुक्यात माहे आॅक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात फळांपिकांचाही समावेश होता. बळीराजाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला होता.बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने मदत निधी देण्यासाठी आकस्मिक निधीतून रक्कम वितरित करण्याबाबत शासन निर्णय पारित करून नुकसान झालेल्या शेतकºयांनी हेक्टरी ८ हजार, व बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय झाला होता. ही मदत २ हेक्टरपर्यंत लागू केली गेली होती. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यासाठी सुधारित अनुदान अंदाजित ६२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.हा निधी तालुक्यातील एका बँकेद्वारे गावनिहाय नुकसानग्रस्त शेतकºयांच्या खाती वर्ग केले जात आहेत. यानुसार कंधाणेतील ४०७ खातेदारांचे ३५ लाख ३८ हजार ८४२ रुपये संबंधित बँकेकडे तहसील कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहेत. पण संबंधित बँकेकडून अद्यापपर्यंत सदरील रक्कम संबंधित खातेदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नसल्याचे समजते. यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनांचा सामना करताना दिसत आहे.सदरील मदतनिधी लवकर वितरित करण्याचा शासन आदेश असताना संबंधितांच्या वेळकाढू धोरणामुळे शासन निर्णयाला हरताळ फासला जात आहे. संबंधित शेतकरी वर्ग मदतनिधीच्या चौकशीसाठी तहसील कार्यालय ते बँक अशी पायपीट करताना दिसत आहे.आधीच अवकाळीने बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले असल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. यातच तोकडी शासन मदत, त्यातही वेळकाढूपणाचे धोरण यामुळे ही मदत बळीराजासाठी मृगजळ ठरत आहे. गाठीला पैसा नाही. अवकाळी निधी वर्ग करण्यासाठी संबंधितांकडे वेळ नाही अशा चक्रात येथील बळीराजा सापडला आहे.अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. यात शासनाने तोकडी मदत जाहीर केलीही पण अद्याप या निधीचा एक रु पयाही आम्हाला मिळालेला नाही. संबंधितांकडे अनेकदा चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळत नाही. अधिकाºयांनी याबाबत शेतकºयांना दिलासा द्यावा.- सुरेश बिरारी, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसा