रंगाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: March 18, 2017 21:20 IST2017-03-18T21:20:10+5:302017-03-18T21:20:10+5:30
रंग लावण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना

रंगाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिक : रंग लावण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना सातपूरजवळील श्रमिकनगरमध्ये शुक्रवारी (दि़ १७) सायंकाळच्या सुमारास घडली़
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सदर अल्पवयीन मुलगी ही तिच्या दुकानात बसलेली होती़ त्यावेळी संशयित रोहित ऊर्फ बाळा मेहेंदळे (२९, रा़ हनुमान मंदिराजवळ, श्रमिकनगर, सातपूर) हा बळजबरीने दुकानात घुसला़ रंग लावण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग केला़ पीडित मुलीच्या आईने त्यास जाब विचारला असता त्याने मुलीस मारहाण केली़ तसेच शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़
या प्रकरणी संशयित रोहित मेहेंदळे विरोधात विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे़