शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
2
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
3
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
5
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
6
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
7
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
8
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
9
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
10
शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली
11
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
12
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
13
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
14
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
15
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
16
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
17
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
18
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
20
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

अल्पवयीन युवतीचा विनयभंग प्रकरणी तीन वर्षे कारावास अन् दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 6:20 PM

लासलगाव : निफाड तालुक्यातील पालखेड येथील सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा विनयभंग करीत लैंगिक छळ केल्याचे आरोपावरून भारत भिमा कडाळे (२७ रा.पालखेड) यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच अकरा हजार रूपये दंडाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली असून सदर दंडापैकी दहा हजार रूपये पिडीत युवतीस देण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्दे घरातील सर्वांना ठार मारून टाकु अशी धमकी दिली

लासलगाव : निफाड तालुक्यातील पालखेड येथील सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा विनयभंग करीत लैंगिक छळ केल्याचे आरोपावरून भारत भिमा कडाळे (२७ रा.पालखेड) यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच अकरा हजार रूपये दंडाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली असून सदर दंडापैकी दहा हजार रूपये पिडीत युवतीस देण्याचे आदेश दिले आहेत.पालखेड येथे दि.३ मे २०१३ रोजी सोळा वर्षीय पिडीत अल्पवयीन युवती दुपारी तिच्या लहान बहीणीसह रस्त्याने घरी जात असतांना आरोपी भारत भिमा कडाळे याने लज्जास्पद भाषा वापरली व तिचा हात पकडला असता त्याला हिसका देवून युवती घरी परतली. या प्रकरणी त्याच्या आईकडे युवतीच्या आई व काकाने तक्रार केली असता परत आरोपी भारत कडाळे याने युवतीची छेड काढीत व लैंगिक छळ केला व घरातील सर्वांना ठार मारून टाकु अशी धमकी दिली.त्यानंतर त्वरीत पिडीतेने विनयभंग केल्याची पिंपळगाव (ब) पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पोलीस उपनिरिक्षक एम. बी. जोगन यांनी आरोपीवर कारवाई करीत त्याला ताब्यात घेतले व तपास करून आरोपींविरु ध्द निफाड न्यायालयात जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.या खटल्याचे कामकाजात सरकार पक्षातर्फे एकुण सात साक्षीदारांची साक्ष सहायक जिल्हा सरकारी विकल अ‍ॅड रमेश कापसे यांनी नोंदविली. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आरोपी भारत डगळे यास तीन वर्षे सश्रम कारावास व ११००० रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.या खटल्यात तपासी अधिकारी म्हणुन पोलिस हवालदार व्हि. आर. वेलजाळी यांनी कामकाज पाहिले. सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. रमेश कापसे यांनी काम पाहीले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी