पोलीस कर्मचाऱ्याकडून मोहाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: April 5, 2017 00:09 IST2017-04-05T00:08:30+5:302017-04-05T00:09:03+5:30
दिंडोरी : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना दिंडोरी तालुक्यात घडली़

पोलीस कर्मचाऱ्याकडून मोहाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
दिंडोरी : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना दिंडोरी तालुक्यात घडली़ मुंबईतील भायखळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत व सुटीनिमित्त गावी आलेला पोलीस शिपाई गोरख मधुकर शेखरे (२५, रा़ टेलिफोन कॉलनी, दिंडोरी) याने मोहाडी येथील अल्पवयीन मुलीवर सोमवारी (दि़ ३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बलात्कार केला़ या प्रकरणी दिंडोरी पोलीसात शेखरेवर बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्यास ७ एपिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ (पान ३ वर)
दिंडोरीतील टेलिफोन कॉलनीतील रहिवासी गोरख मधुकर शेखरे हा मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे़ सुटीवर आलेला शेखरे सोमवारी (दि़३) मोहाडीला आला़ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घराबाहेरील ओट्यावर भांडी धुण्याचे काम करीत होती़ शेखरे याने पाठीमागून येऊन तिच्यावर बलात्कार केला़ मुलीने आरडाओरड केल्याने तिचे भाऊ व कुटुंबीय तसेच नागरिकांना ही बाब समजली़ त्यांनी पीडितेची सुटका करून शेखरे यास पोलिसांच्या हवाली केले़ या प्रकरणी पीडित मुलीने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेखरे विरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को)अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दिंडोरी पोलिसांनी त्यास अटक केली आहे. मंगळवारी (दि़४) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास दिंडोरीचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित करीत आहेत़ (प्रतिनिधी)