सुटीच्या दिवशी पकडले चोरीचे गौण खनिज
By Admin | Updated: February 16, 2016 00:30 IST2016-02-15T23:52:23+5:302016-02-16T00:30:54+5:30
सुटीच्या दिवशी पकडले चोरीचे गौण खनिज

सुटीच्या दिवशी पकडले चोरीचे गौण खनिज
मालेगाव : तहसीलची कारवाईंमालेगाव : शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असून, तहसील प्रशासनातर्फे याकडे सर्रास डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होत असताना येथील तहसील विभागाने चक्क सुट्टीच्या दिवशी गौण खनिज चोरी व उपसा करणारे ट्रॅक्टर पकडल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.
तालुक्यात गौणखनिज बंदी असताना सर्रास उपसा व चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. हा आरोप खोटा असल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे असले तरी दोन्ही नदीपात्रातील वाळू गायब झाली आहे. तहसील कचेरीतील कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी गौणखनिज उपसा व चोरी करणारे काही टॅ्रक्टर पकडले आहेत. यामुळे तालुक्यात गौणखनिज उपसा व चोरी सुरू असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळते. यातील काही वाहनांना दंड करून सोडून देण्यात आले.
यापुढेही तहसील प्रशासनातर्फे गौणखनिज चोरट्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, तसेच पथकांनी छापे टाकून वाळू चोरीस आळा घालावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.(प्रतिनिधी)