अल्पवयीन गुन्हेगार ताब्यात
By Admin | Updated: January 6, 2016 00:08 IST2016-01-05T23:53:52+5:302016-01-06T00:08:24+5:30
मंगल कार्यालयातील चोरीप्रकरणी

अल्पवयीन गुन्हेगार ताब्यात
नाशिक : पंचवटीतील एका कार्यालयातून वधूचे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मध्य प्रदेशातील एका बालगुन्हेगारास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ रविवारी (दि़३) दुपारच्या सुमारास राका ग्रीन स्क्वेअर मंगल कार्यालयात ही घटना घडली होती़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राका ग्रीन स्क्वेअर मंगल कार्यालयामधून चोरी केल्यानंतर हा अल्पवयीन गुन्हेगार सोमेश्वरजवळील गुप्ता लॉन्समध्ये चोरीच्या उद्देशाने फिरत होता़ पंचवटीतील चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर या मुलाचे फोटो शेअर केले होते़ दरम्यान, पोलिसांना हा अल्पवयीन मुलगा गुप्ता लॉन्समध्ये दिसल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली़ मात्र हा अल्पवयीन गुन्हेगार भलताच कलंदर असून, तो पोलिसांचीही दिशाभूल करीत असल्याचे समोर आले आहे़
दरम्यान, या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी एपीआय योगेश देवरे मात्र बालगुन्हेगाराबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़ (प्रतिनिधी)