रेल्वेतील हल्ल्याप्रकरणी अल्पवयीन मुलास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:15 IST2021-04-20T04:15:56+5:302021-04-20T04:15:56+5:30
अमनसिंह चौव्हाण व पवनकुमार शिवप्रसाद या चहा विक्रेत्यावर या संशयिताने साथीदारांसह रेल्वे प्रवासात चाकूने वर केले होते. हल्लेखोर चालत्या ...

रेल्वेतील हल्ल्याप्रकरणी अल्पवयीन मुलास अटक
अमनसिंह चौव्हाण व पवनकुमार शिवप्रसाद या चहा विक्रेत्यावर या संशयिताने साथीदारांसह रेल्वे प्रवासात चाकूने वर केले होते. हल्लेखोर चालत्या गाडीची चेन ओढून देवळाली स्थानकाजवळ उतरून फरार झाले होते. मुख्य संशयित अल्पवयीन नाशिकरोड रेल्वे पार्किंग येथे येणार असल्याची खबर गुन्हे पथकाला मिळाली होती. हवालदार संतोष उफाडे, महेश सावंत, चंद्रभान उबाळे, विजय कपिले, महेश सावंत, सहायक निरीक्षक पंढरीनाथ मगर, भुसावळ आरपीएफचे कैलास बोडके तपास करत होते. हा संशयित पार्किंगमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच संतोष उफाडे व सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, प्रभारी अधिकारी विष्णू भोये यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक केली. रेल्वेतील वर्चस्ववादातून फिर्यादींशी हल्लेखोरांचे वाद झाले होते. त्यातूनच हा हल्ला झाला होता.