दोन प्रसिद्ध देवस्थानांना जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न

By Admin | Updated: January 31, 2016 00:14 IST2016-01-31T00:14:30+5:302016-01-31T00:14:57+5:30

नगरसूल-तिरुपती साप्ताहिक गाडी सुरू

Ministry of Railways's efforts to connect two famous places of worship | दोन प्रसिद्ध देवस्थानांना जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न

दोन प्रसिद्ध देवस्थानांना जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न

येवला : नगरसूल-तिरुपती रेल्वेला श्निवारी दक्षिण मध्य रेल्वेने हिरवा झेंडा दिला. नगरसूलकरांनी या निर्णयाचे धूमधक्यात स्वागत केले. दक्षिण मध्य रेल्वेने शिर्डी येथील साईभक्त तसेच दक्षिणेतील श्रीमंत बालाजी यांच्या भक्तांची भेट सहज सोपी होण्यासाठी नगरसूल - तिरुपती साप्ताहिक रेल्वेला नव्याने सुरुवात केली आहे.
आगामी रेल्वे अर्थसंकल्पात ती कायमस्वरूपी होण्याची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू करण्याची शक्यता आहे. शनिवारी (दि.३०) या रेल्वेचे स्टेशन अधीक्षक हरीश महाले व प्रवाशांनी स्वागत केले. दक्षिणेत प्रतिशिर्डी रेल्वेस्थानक म्हणून नावाजलेल्या नगरसूल रेल्वेस्थानकाला नव्याने एक रेल्वे मिळाल्याने नगरसूलकरांसह प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
नगरसूल ते तिरुपती साप्ताहिक रेल्वे प्रथम फेब्रुवारी महिन्यात पाच फेऱ्या मारणार आहे. नंतर रेल्वे मंत्रालय व दक्षिण मध्य रेल्वे नियमित करणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. गाडी नं ०७४१८ नगरसूल - तिरुपती शनिवारी नगरसूलला सकाळी ११.१५ वाजता येईल. त्याच दिवशी रात्री १० वाजता नगरसूल येथून सुटेल, तर तिरुपती येथे रविवारी रात्री ७.३० वाजता पोहोचेल. गाडी नं ०७४१७ तिरु पती - नगरसूल शुक्र वारी सकाळी ७.३० वाजता तिरुपती (बालाजी)हून सुटेल. नगरसूलला शनिवारी सकाळी ११.१५ पोहोचेल. या रेल्वेचा जाताना-येताना नगरसूल-औरंगाबाद-जालना-परभणी-लातूर-सिकंदराबाद-बेगमपेठ-नालगोडा-गुटूर-तिरुपती बालाजी असा मार्ग आहे. व्हाया सिंकदराबादमार्गाने ती धावणार आहे. (वार्ताहर )

Web Title: Ministry of Railways's efforts to connect two famous places of worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.