पाणीपुरवठ्याच्या योजना मार्गी लावणार : मंत्री सावरा

By Admin | Updated: February 10, 2017 00:16 IST2017-02-10T00:15:59+5:302017-02-10T00:16:10+5:30

पाणीपुरवठ्याच्या योजना मार्गी लावणार : मंत्री सावरा

Minister for Water Supply to be implemented: Minister Sawara | पाणीपुरवठ्याच्या योजना मार्गी लावणार : मंत्री सावरा

पाणीपुरवठ्याच्या योजना मार्गी लावणार : मंत्री सावरा

त्र्यंबकेश्वर : परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून, पाणीपुरवठ्याच्या योजना मार्गी लावण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनिमित्त गुरुवारी तालुक्यातील ठाणापाडा येथे भारतीय जनता पार्टीची सभा झाली, त्यावेळी मंत्री सावरा बोलत होते. यापूर्वी योजना कागदोपत्री पूर्ण होत असत. आता मात्र तसे होणार नाही. आदिवासी वसतिगृह, अंगणवाडी आदि प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सावरा यांनी सांगितले. हरसूल गटाचे उमेदवार मोतीराम देशमुख, श्रीकांत गायधनी, बापू पाटील, बाळू गोऱ्हे उपस्थित होते.

Web Title: Minister for Water Supply to be implemented: Minister Sawara