शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

जिल्ह्यातील तब्बल २८३५ रुग्णांना अत्यल्प बाधा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 4:39 PM

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्यातील सध्या बाधित असलेल्या एकूण २८८८ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी तब्बल १५५९ असिम्पटॅमॅटीक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण्याची शाश्वती अधिक आहे.

ठळक मुद्दे१२७६ अल्प लक्षणे१५५९ असिम्पटॅमॅटीक

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्यातील सध्या बाधित असलेल्या एकूण २८८८ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी तब्बल १५५९ असिम्पटॅमॅटीक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण्याची शाश्वती अधिक आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ८८८ रु ग्णांवर उपचार सुरु असून रविवार दुपारपर्यंत ४५४ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १८८, चांदवड २४, सिन्नर ११७, दिंडोरी ५०, निफाड १६५, देवळा २१, नांदगांव ६३, येवला ४०, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १५, पेठ ०३, बागलाण ३६, इगतपुरी १५४, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण ९३२ पॉझटिीव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८७०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ७९ तर जिल्ह्याबाहेरील ०७ असे एकूण २ हजार ८८८ रु ग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ११ हजार ९४३ रु ग्ण आढळून आले आहेत. मात्र, त्यातील ८६०१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन यापूर्वीच घरी परतले आहेत.इन्फोअत्यल्प बाधित किंवा लक्षणेहीन आठवडाभरात बरेज्या रुग्णांना कोरोनाची अत्यल्प बाधा झालेली आहे किंवा ज्या रुग्णांमध्ये लक्षणे अजिबात नाहीत, केवळ त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ते बाधित ठरले, अशा रुग्णांना बरे होण्याचा कालावधीदेखील पाच ते सात दिवस अर्थात केवळ एक आठवडा असतो. त्यामुळे असे अत्यल्प बाधित रुग्ण एखाद्या क्वारंटाईन सेंटरमध्येदेखील अगदी सहजपणे उपचार घेऊन बरे होऊ शकतात.इन्फोकेवळ ९७ रुग्ण व्हेंटिलेटरवरज्या रुग्णांना श्वसनाचा प्रचंड त्रास जाणवू लागतो, केवळ अशा रुग्णांनाच आॅक्सिजनवर किंवा सर्वाधिक गंभीर असणाऱ्यांनाच व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६७२ रुग्ण हे आॅक्सिजनवर तर केवळ ९७ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक