शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

मिनी मंत्रालयाच्या इच्छुकांना आरक्षणाचे लागले वेध

By admin | Updated: February 18, 2016 23:56 IST

गट रचनेबाबतही उत्सुकता : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक

 नाशिक : अवघ्या दहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक राहिल्याने मिनी मंत्रालय म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्यांना जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचना व आरक्षणाबाबत वेध लागल्याचे चित्र आहे.गट व गणाची रचना तयार करण्यासाठी जादा कालावधीची प्रक्रिया राबवावी लागत असून, त्यानुसार गट व गणांच्या संख्येत वाढ किंवा घट आणि त्यानुसार मागविलेल्या हरकती व सुनावणी यांसह महिना दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांची मुदत जरी २१ मार्चपर्यंत असली तरी त्यापूर्वीच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना निवडणुकांना सामारे जावे लागणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेचे ७३ गट व पंचायत समितीचे १४६ गण आहेत. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या सात गटांच्या रचना व नवनियुक्त गटांची निर्मिती करणे जिल्हा निवडणूक कार्यालयास आवश्यक आहे. त्यातील चांदवड गटाची यापूर्वीच कानमंडाळे गटात रूपांतर झाले आहे. त्यामुळे दिंडोरी, देवळा, सुरगाणा, निफाड, पेठ व कळवण गटांची रचना करणे अद्याप बाकी आहे. या गटांऐवजी आता तालुका स्तरावर नगरपंचायत, परिषदा यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे दिंडोरी गटाचे मोहाडी, सुरगाणा गटाचे बोेरगाव, निफाड गटाचे पिंपळस रामाचे, देवळा गटाचे पिंपळगाव वाखारी किंवा कणकापूर-खर्डे, कळवण गटाचे मानूर, पेठ गटाचे करंजाळी गटात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यातच गटनिहाय आरक्षण येत्या जुलै किंवा आॅगस्टमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)