वावी येथे विहिरीजवळ घडविला सुरुंग स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:21+5:302021-07-04T04:11:21+5:30
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वावी शिवारात सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कडेला हॉटेल पाहुणचारच्या पुढे विवेक लक्ष्मण सांगळे यांची शेतजमीन गट ...

वावी येथे विहिरीजवळ घडविला सुरुंग स्फोट
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वावी शिवारात सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कडेला हॉटेल पाहुणचारच्या पुढे विवेक लक्ष्मण सांगळे यांची शेतजमीन गट नं. ७५२/२ असून, या शेतजमिनीत असलेल्या विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्याच्या स्टार्टर पोलजवळ अज्ञात संशयिताने जिवे मारण्याच्या उद्देशाने स्फोटके मातीत गाडून ठेवली. गुरुवारी (दि. १) सकाळी सांगळे यांचा शेतमजूर खंडू वाघचौरे हा विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेला असता स्टार्टरचे बटन दाबताच जमिनीत गाडलेल्या स्फोटकांचा प्रचंड स्फोट झाला. या स्फोटात वाघचौरे यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत होऊन ते कोसळले. स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जमिनीचे मालक सांगळे यांनी वावी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी वाघचौरे यांना उपचारार्थ सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ नाशिकला हलविण्यात आले.
याप्रकरणी वावी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते पुढील तपास करीत आहेत.
फोटो - ०३ वावी ॲक्सिडेंट
वावी येथे विहिरीजवळ जमिनीत पेरलेले सुरुंग.
030721\03nsk_41_03072021_13.jpg
फोटो - ०३ वावी ॲक्सीडेंट