शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भावली धरण पर्यटनस्थळ करण्याचा मानस : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:59 IST

नांदूरवैद्य : पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरण परिसरात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देभावली, वैतरणा धरण परिसरात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरण परिसरात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.इगतपुरी तालुक्यातील भावली आणि वैतरणा धरण परिसरात पाटील यांनी भेट देत पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. पर्यटकांना आकर्षित करणारे सौंदर्य या भागात असल्याने लवकरच आवश्यक त्या योजना राबविण्यासाठी नियोजन करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, संदीप गुळवे व गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, कमलाकर नाठे, रामदास धांडे, अरु ण गायकर, पीके ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू, अर्जुन टिळे, उदय जाधव आदी उपस्थित होते. अतिशय निसर्गरम्य वातावरणात भावली धरण असून, अनेक पर्यटक सुटीच्या दिवशी येथे भेट देतात. त्याअनुषंगाने या धरण भागात पर्यटन क्षेत्र विकसित केले जाईल. इगतपुरी येथे बरीच प्रेक्षणीय स्थळेही यानिमित्ताने विकसित होतील. नैसर्गिक धबधब्यांचे सुशोभीकरणही करता येऊ शकते, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :WaterपाणीDamधरण