शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

तो उधळलेला सांड तर MIM भाजपची बी टीम, टिकैत यांची औवेसींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 15:20 IST

राकेश टिकैत गुरुवारी हैदराबादला गेलो होते, त्यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे औवेसी यांना उधळलेला बैल, अशी उमपा देत बोचरी टीकाही केली

ठळक मुद्देभाजपला जेथे पराभवाची भीती असते, तेथे औवेसींची रॅली काढण्यात येते. औवेसी हे भाजपचे चाचाजान आहेत, ते हिंदू-मुस्लीम करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोपही टिकैत यांनी औवेसींवर केला आहे

नवी दिल्ली - तीन कृषी कायदे रद्द करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मधाळ भाषा वापरली आहे. या आंदोलनात ७५० जण मरण पावले, आंदोलकांवर १० हजार खटले भरण्यात आले आहेत. ते रद्द होण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली नाही. पंतप्रधानांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही, असे म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदींवर प्रहार केला. तसेच, अद्यापही हे आंदोलन सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. आता, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 

राकेश टिकैत गुरुवारी हैदराबादला गेलो होते, त्यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे औवेसी यांना उधळलेला बैल, अशी उमपा देत बोचरी टीकाही केली. तुमच्या इथला एक उधललेला बैल तुम्ही मोकाट सोडला आहे. तो भाजपची मदत करत असून त्याला इथंच बांधून ठेवा, असे टिकैत यांनी म्हटले. टिकैत यांनी औेवेसींचे नाव न घेता, त्यांच्यावर आणि एमआयएमवर टीका केली. तो बोलतो एक आणि करतो दुसरंच. त्यामुळे, त्याची चौकशी करायला हवी, त्याला बांधून ठेवा, हैदराबाद आणि तेलंगणाच्या बाहेर जाऊ देऊ नका. जर, तो बाहेर पडला तर भाजपलाच मदत करेल, हे देशाला माहित आहे. भाजप ए आणि हा भाजपची बी टीम असल्याचा आरोपही टिकैत यांनी केला.  भाजपला जेथे पराभवाची भीती असते, तेथे औवेसींची रॅली काढण्यात येते. औवेसी हे भाजपचे चाचाजान आहेत, ते हिंदू-मुस्लीम करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोपही टिकैत यांनी औवेसींवर केला आहे. भाजपला पराभूत करणे, ही संयुक्त किसान मोर्चाची भूमिका आहे. आम्ही युपीमध्ये जाऊन लोकांना सांगू, भाजपला पराभूत करण्याचं आवाहन आम्ही करू, असेही टिकैत यांनी म्हटलं.

हमी भावाचा कायदा करा

पंतप्रधान मोदी यांनी इतकीही गोड भाषा वापरू नये की ज्यापुढे मधही फिका पडेल. टीव्हीवरून घोषणा करताना मोदींनी जी मधाळ भाषा वापरली तीच त्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी करतानादेखील कायम ठेवावी. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे का घेतले, याचे कारण आम्हाला माहिती नाही. मात्र, काही राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका होत आहे. किमान हमी भावासाठी कायदा करा, ही आमची मागणी कायम आहे. त्यासाठीही यापुढेही शेतकरी संघर्ष करत राहणार आहेत.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाhyderabad-pcहैदराबाद