शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:22 IST

भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात लक्ष्मीपूजेला अनन्य साधारण महत्व असून रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजेचा मुहूर्तसाधत शहरातील अनेक व्यावसायिकांनी नवीन व्यावसायिकांची सुरुवात केली.

नाशिक : भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात लक्ष्मीपूजेला अनन्य साधारण महत्व असून रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजेचा मुहूर्तसाधत शहरातील अनेक व्यावसायिकांनी नवीन व्यावसायिकांची सुरुवात केली. तर अनेकांनी घराचे स्वप्न साकार करीत आपल्या हक्काच्या नवीन घरात प्रवेश केला.तर स्थीर स्थावर झालेल्याना नाशिककरांनी वाहन खरेदीला प्राधान्य दिले. यात चारचाकी वाहनांचे प्रमाण अधिक असले तरी व्यावसायिक वाहनांचीही ग्राहकांनी लक्ष्मीपूजेला मोठ्या प्रमाणात खरेदी केली. तर शेतकऱ्यांनी ट्रक्टर आणि शेतीउपयोगी साधनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्याचप्रमाणे यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे खरिपासोबतच रब्बीचे पीकही चांगले येण्याची अपेक्षा असल्याने गुंतवणूक अनेकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिल्याने सराफ बाजारालाही झळाळी प्राप्त झाल्याने नाशिकच्या बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल झाली.शहरात आठवडाभरापासून पावसाच्या वातावरणामुळे दिवाळीच्या खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. औद्योगिक वसाहत आणि खासगी आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना शनिवारपासून सुट्या असल्यामुळे कुटुंबातील सर्वांना कपडे, सजावटीचे साहित्य, लक्ष्मीमातेची प्रतिमा, मूर्ती, पूजा साहित्य, पणत्या, अकाशकंदील, केरसुनीसह किराणा, सुकामेवा, कपडे, खाद्यपदार्थ, भेटवस्तूंची ग्राहकांनी जोरदार खरेदी केली.शहरातील बाजारपेठांसह विविध मॉलमधील सवलतीकडेही ग्राहक मोठ्या प्रमाणात आक र्षित झाल्याचे पाहायला आले. अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर घरातील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी केली. त्याचप्रमाणे अनेकांनी लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर वाहन खरेदी केली असून, अनेकांनी लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचे नियोजन केले आहे.लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चारचाकी वाहनांसोबतच व्यावसायिक वाहनांची खरेदी करणाºया ग्राहकांची संख्यामोठ्या प्रमाणात असून, संपूर्ण दीपोत्सवात रोज किमान तीनशे ते चारशे दुचाकी वाहनांची विक्री झाली असून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर हा आकडा तीन ते साडेतीन हजारांवर पोहोचल्याचे वितरकांनी सांगितले.सण उत्सवाच्या काळात वाहन बाजारात तेजी आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची वर्दळ वाढल्याने त्याचा परिणाम विक्रीवर होऊन वाहानांची विक्री वाढली आहे. मात्र पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती आणि सरकारचे वाहन बाजाराविषयीचे धोरण यावरून हा ट्रेंड पुढे चालणार की नाही ते ठरणार आहे.- सुरेंद्र पुजारी, सीईओ, वासन टोयोटोचोख सोने खरेदीला पसंतीसराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मूहूर्तावर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने आणि चांदीच्या भांड्याची खरेदी केल्यामुळे कोट्यवधींची उलाढाल झाली. नाशिकरांनी लक्ष्मीपूजेला चोख सोने खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती दिली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही सोन्याचे भाव ३८ हजार ६०० रुपयांपर्यंत स्थिर राहिले. तर चांदीच्या भावात मात्र काही प्रमाणात वाढ झाली.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजारGoldसोनंNashikनाशिक