शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन फसवणुकीतील लाख रुपये मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 18:53 IST

सायबर पोलिसांची कामगिरी : येवला, चांदवड येथील प्रकार

ठळक मुद्देयेवला आणि चांदवड येथील व्यक्तींना फसवून त्यांच्याकडून रक्कम उकळण्याचा प्रयत्न ग्रामीण सायबर पोलिसांनी हाणून पाडला

नाशिक : आॅनलाइनद्वारे येवला आणि चांदवड येथील व्यक्तींना फसवून त्यांच्याकडून रक्कम उकळण्याचा प्रयत्न ग्रामीण सायबर पोलिसांनी हाणून पाडला असून संबंधित तक्रारदारांना त्यांची लाख रुपयाची रक्कम परत मिळवून दिली आहे.ग्रामीण सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला येथील डॉ. प्रदीपचंद्र गायकवाड यांना अज्ञात क्रमांकावरून संपर्क साधत आपण बॅँकेतून बोलत असून तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवायची असल्याचे सांगत के्रडिट कार्डची माहिती काढून घेतली. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागून घेत काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्ड लिमिटमधील ९० हजार रुपये वळते झाल्याचा मेसेज गायकवाड यांना आला. या मेसेसमध्ये एका वॉलेट कंपनीचा उल्लेख होता. तर दुसऱ्या घटनेत चांदवड येथील मनोज साळी यांना ट्रॅव्हल्सचे बुकींग करताना एक आॅनलाइन लिंक आली व त्याद्वारे त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये वळते करण्यात आले. गायकवाड आणि साळी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही दखल घेत गायकवाड यांची रक्कम काढून घेण्याच्या आत थांबविण्यात आली तर साळी यांना वॉलेटमध्ये गेलेली रक्कम परत मिळवून देण्यात आली. सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे, सोनाली पाटील. प्रमोद जाधव, परिक्षित निकम, प्रकाश मोरे, सुनील धोकट, विकास टेकुळे, प्राजक्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Nashikनाशिकonlineऑनलाइन