लाखो रु पयांची झाली उलाढाल..!
By Admin | Updated: November 11, 2015 22:30 IST2015-11-11T22:29:45+5:302015-11-11T22:30:32+5:30
कळवण : वाहन बाजाराला झळाळी; इलेक्ट्रॉनिक्ससह पारंपरिक वस्तूंना मागणी

लाखो रु पयांची झाली उलाढाल..!
मनोज देवरे कळवण
कळवण नगरपंचायतची नुकतीच निवडणूक संपन्न झाली. निवडणुकीत कळवण शहरात कोट्यवधी रु पयांची उलाढाल होऊन मतदारराजाला लक्ष्मीचे मोठ्या प्रमाणात दर्शन झाले. निवडणूक निकालानंतर लक्ष्मीदर्शन घडविणाऱ्यांना काही उमेदवारांना मतदारांनी स्वीकारले तर काही उमेदवारांना नाकारले हे स्पष्ट झाले असून, नाकारलेल्या काही उमेदवारांनी मतदारराजाकडून लक्ष्मी वसूल करण्याचा फंडा अवलंबला; मात्र हा फंडा एका उमेदवाराच्या चांगलाच अंगलट आला असून, दिवाळीच्या फराळानिमित्ताने त्या उमेदवारांच्या वसूलफंडाची चांगलीच चर्चा कळवण शहरात सुरु आहे.
उमेदवाराकडून हजारच्या पटीत मतदाराचे मोल मोजले गेल्याने कोट्यवधी रुपयांच्या या लक्ष्मीदर्शनाच्या उलाढालीमुळे कळवणच्या बाजारपेठेवरदेखील त्याचा परिणाम झाला आहे, मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.
सर्वच व्यावसायिकांचे व्यवसाय तेजीत आले आहेत. काही व्यापारी बांधवानी दिवाळीला लागून निवडणूक आल्याने सर्वसामान्य माणसाकडूनदेखील दिवाळी हजारच्या पटीत खरेदी केली असल्याचे कबूल केले. किराणा, कापड, रेडिमेड व इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहनबाजार येथे कोट्यवधी रु पयांची उलाढाल झाली असून, मागील वर्षाच्या दिवाळीपेक्षा यंदाच्या दिवाळीत कळवणची बाजारपेठ फुलून गेली आहे.
वसूबारसपासून सुरू झालेल्या दीपावली सणानिमित्त कळवण शहराची बाजारपेठ फुलली आहे. सोमवारी धनत्रयोदशी तर मंगळवारी नरकचतुर्दशी तसेच लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत सोन्या-चांदीसह विविध वस्तूंच्या खरेदीमुळे लाखोंची उलाढाल झाली. दीपावली सणानिमित्त बाजारपेठेत मोठी रेलचेल दिसून आली. महागाईचा भडका उडाला असला निवडणुकीत उमेदवारांकडून, मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन घडविले गेल्याने सर्वसामान्य कळवणकर नागरिकदेखील खरेदीसाठी घराबाहेर पडले असल्याचे चित्र आहे. बुधवारचा आठवडे बाजार आणि लक्ष्मीपूजन असल्याने कळवणच्या बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप आले होते.
उत्सवामुळे लागून आलेल्या सुट्यांसह खासगी नोकरदारांना मिळालेल्या दिवाळीच्या
बोनसमुळे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली
होती.
वाहन बाजाराची उलाढाल..
दसरा आणि दिवाळीच्या काळात शेतकरीवर्गाकडून दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीचे प्रमाण बऱ्यापैकी असते. यंदा ते ४० ते ५० टक्केपर्यंत ते खाली आले. अशीच स्थिती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीची आहे. सध्या होणाऱ्या वाहन व इतर वस्तूंच्या खरेदीत नोकरदार मंडळीचाच ५० टक्के वाटा आहे. त्यातही हप्प्त्याने वस्तू घेण्याकडे कल मोठा आहे. अनेक फायनान्स कंपन्या शून्य टक्के व्याज दराने फायनान्स उपलब्ध करून देत आहेत. त्याचा फायदा ग्राहक उचलत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची उलाढाल अपेक्षित नसल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर यंदाचा वाहन बाजार गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी उलाढाल करणारा ठरला आहे. चारचाकी वाहनांना पाहिजे तसा प्रतिसाद नाही, परंतु दुचाकी
वाहनांची विक्री बऱ्यापैकी आहे. याउलट घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत किमान २० ते ३० टक्के जादा विक्र ी होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. दरम्यान, दुचाकी वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्र ीतून कोट्यवधीची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
वाहन आणि घरातील चैनीच्या वस्तू दिवाळीत खरेदीसाठी बारमाही योजना उपलब्ध करून आणि हप्त्याने विक्रीची सोय उपलब्ध करून देत असल्यामुळे दिवाळीतच खरेदी हा ट्रेण्ड राहिलेला नाही. दुचाकीचे मार्केट त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आहे. विविध कंपन्यांच्या आतापर्यंत १०० ते २०० पेक्षा अधिक दुचाकी विक्री झाल्या आहेत. आणखी किमान १०० दुचाकी विक्र ी झाल्या तरी हा आकडा ३००च्या आतबाहेरच राहणार हे जवळपास स्पष्ट झाले असून, हिरो शोरूमचे संचालक बाळासाहेब खैरनार व होंडा शोरूमचे संचालक रत्नदीप शिरोरे यांनी सांगितले.
आतापर्यंत वाहन विक्र ी झालेली खरेदी ही नोकरदार व शेतकरी मंडळींकडूनच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणखी काही वाहने विक्र ीचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी....
विविध क्षेत्रात कार्यरत कर्मचारी , व्यावसायिक व् सर्वसामान्य जनतेकडून दिवाळी निमित्ताने बाजारातून मोठयÞा प्रमाणावर विविध वस्तूंची खरेदी करण्यात आली. वाहन, सोने, टीव्ही, फ्रीज, एसी, मोबाइल, फिर्नचर आदी वस्तूंच्या खरेदी-विक्र ीतून लाखो रु पयांची उलाढाल झाल्याचे समर्थ इलेक्ट्रॉनिकचे संचालक शैलेश आहेर व कृष्णा इलेक्ट्रॉनिक्सचे राजेश मुसळे या विक्र ेत्यांकडून सांगण्यात आले.