लोहोणेर : खालप येथे सोमवारी रात्री वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाने लाखो रुपयो नुकसान झाले असून, येथील तलाठी दिलीप कदम यांनी नुकसानाचा पंचनामा केला आहे.
सोमवारी (दि.३१) रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळ व पावसाने येथील शेतकरी पोपट डांबरे यांच्या घराची पत्रे उडाल्याने संसार उपयोगी साहित्य, कांदे, बाजरी या पावसात भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. येथील ग्रामपंचायतीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे पत्रे उडाल्याने मेडिकल, कृषी खाद्य दुकान, सलुन, टेलर दुकान, फोटो स्टुडिओ आदी दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी येथील शेतकरी बांधवांसह व्यापारी वर्गाने केली आहे.