ठेंगोड्याला कांदा चाळीला आग लागून लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 11:42 PM2022-02-05T23:42:02+5:302022-02-05T23:42:02+5:30
सटाणा : तालुक्यातील ठेंगोडा येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून कांद्याच्या उभ्या पिकासह सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. यात कांदा दोन पाखी चाळ, चार एकर क्षेत्राचे ठिबक सिंचन नळी, पाईप, पंधरा ट्रॅक्टर कडबा जळून खाक झाले आहे. तर आगीत शेतमजूर बाळू अहिरे हा जखमी झाला.

ठेंगोडा येथील प्रगतिशील शेतकरी हेमंत तुकाराम पगार यांच्या गट ३७१/१ मधील शेतात अचानक विजेच्या शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी (दि. ४) दुपारी भीषण आग लागली. या आगीत उभ्या कांदापिकासह ठिबक नळी, कडबा जळून खाक झाला. आग विझवताना शेतमजूर बाळू अहिरे हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेचा पंचनामा केला असून १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच बागलाणचे आमदार दिलीप बोरसे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे बागलाण तालुक्याचे तालुकाध्यक्ष माणिकराव देवरे व कळवण तालुक्याचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, बिंदूशेठ शर्मा उपस्थित होते. या शेतकऱ्यास योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य भरत धनवटे, दौलत पगार, सुनील निरभवणे व शेतकरी बांधव उपस्थित होते. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यास नुकसानभरपाई मिळावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.