तीन नगरपालिकांना कोट्यवधीचा निधी
By Admin | Updated: September 7, 2014 00:39 IST2014-09-07T00:34:23+5:302014-09-07T00:39:00+5:30
तीन नगरपालिकांना कोट्यवधीचा निधी

तीन नगरपालिकांना कोट्यवधीचा निधी
नाशिक : राज्यातील नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी राज्य सरकारने विशेष अनुदान मंजूर केले असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला, नांदगाव व मनमाड नगरपालिकांचा समावेश आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी या नगरपालिकांना विकासकामांसाठी मिळणार आहे.
या विशेष अनुदानातून मनमाड नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी दीड कोटी रुपये मिळणार असून, त्यातून शहरात सध्या सुरू असलेली पाणीपुरवठा योजना आणखी सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
नांदगाव नगरपालिकेसाठी ३९ लाख ८४ हजार रुपये विविध विकासकामांसाठी, तर येवला नगरपालिकेसाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून भुयारी गटार योजना राबविण्यात येऊन शहराच्या अंतर्गत सौंदर्यात भर पडणार आहे.