महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक
By Admin | Updated: December 25, 2015 00:06 IST2015-12-25T00:04:20+5:302015-12-25T00:06:30+5:30
महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक
नाशिक : महापालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सुमारे आठ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून तिघा महिलांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार कारंजावरील गोरेराम लेनमध्ये हेमा धनाजी चव्हाण (५९) राहतात़ संशयित हंसा लालजी मकवाना, मनीषा मकवाना व विजया मकवाना या तिघींनी चव्हाण यांची मुलगी हर्षा हिला नाशिक महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले़
यानंतर ७ नोव्हेंबर २०१२ ते जानेवारी २०१५ या कालावधीत चव्हाण यांच्याकडून संशयित मनीषा मकवाना व विजया मकवाना यांनी ७ लाख ८५ हजार रुपये घेतले़ मात्र पैसे घेताना तयार केलेल्या कागदपत्रांवर संशयितांनी वेगवेगळ्या सह्या करून नोकरी वा घेतलेली रक्कम न देता फसवणूक केली़
या प्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मकवानांविरुद्ध सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)