शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

महात्मा गांधी रोडवरील  दुकानदाराची लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:41 IST

महात्मा गांधी रोडवरील इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ३७ बनावट ग्राहकांनी फायनान्स करून वस्तू खरेदी केल्याचे दाखवून खासगी फायनान्स कंपनीच्या दोन प्रतिनिधींनी दुकानदाराची १५ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

नाशिक : महात्मा गांधी रोडवरील इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ३७ बनावट ग्राहकांनी फायनान्स करून वस्तू खरेदी केल्याचे दाखवून खासगी फायनान्स कंपनीच्या दोन प्रतिनिधींनी दुकानदाराची १५ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी बजाज व एचडीबी फायनान्सचे प्रतिनिधी सुनील साबणे (रा. सुभाष वाचनालयाजवळ, मिरजकर वाडा, सोमवार पेठ) व रवि महाले (रा. चौथी स्कीम, सिडको) या दोघांविरोधात भद्रकाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  राजेंद्र पारख (रा़ गंगापूररोड) यांचे महात्मा गांधी रोडवरील स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या बिल्डिंग नंबर ५ मध्ये पारख इलेक्ट्रॉनिक हे दुकान आहे. या दुकानात एचडीबी फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी संशयित रवि महाले व बजाज फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी संशयित सुनील साबणे या दोघांनी जून २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत पारख यांची १५ लाख ११ हजार ५६५ रुपयांची फसवणूक केली़ संशयित महाले याने एचडीबी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून २८ ग्राहकांना तर साबणे याने बजाज फायनान्समार्फत नऊ ग्राहकांना दुकानातील विविध इलेक्ट्रॉनिक  वस्तू फायनान्सद्वारे मिळवून देत आहोत, असे दाखविण्यासाठी दुकानमालकासमोर बनावट ग्राहक उभे करून ते खरे असल्याचे दाखविले़  या ३७ बनावट ग्राहकांचा फायदा घेऊन या दोघा संशयितांनी पारख इलेक्ट्रॉनिक्सचे मालक राजेंद्र पारख यांची १५ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केली़

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा