पेपर मिलमध्ये लाखोंचा अपहार

By Admin | Updated: October 12, 2015 22:14 IST2015-10-12T22:11:24+5:302015-10-12T22:14:39+5:30

संचालक मंडळाकडून विश्वासघात : पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल

Millions of crores in paper mill | पेपर मिलमध्ये लाखोंचा अपहार

पेपर मिलमध्ये लाखोंचा अपहार

नाशिक : हिरावाडीतील भिकुसा पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळातील काही सदस्यांनी सुमारे ४४ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
परशराम विश्वनाथसा क्षत्रिय (५५, रा़७/८, क्षत्रिय अपार्टमेंट, अशोकस्तंभ, नाशिक) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बलराम विश्वनाथसा क्षत्रिय, गौरी बलराम क्षत्रिय व इतर चौघे हे हिरावाडीतील भिकुसा पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत़ या संशयितांनी २३ एप्रिल २०१४ पासून कंपनीतील मालाच्या व्यवहारापोटी मिळालेले ४४ लाख १७ हजार ४४ रुपये कंपनीच्या बँक खात्यावर जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:च्या खात्यावर जमा करून या रकमेचा अपहार केला़ या प्रकरणी परशराम क्षत्रिय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात बलराम व गौरी क्षत्रिय यांच्यासह चौघांविरुद्ध फसवणूक व विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Millions of crores in paper mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.